देशात गेल्या २४ तासात सुमारे ९१ हजार नव्या कोरोना बाधितांची नोंद

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात आतापर्यंत एकूण २६३० जण ओमायक्रोन ने बाधित झाले असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.  त्यातील महाराष्ट्रात ७९७ जण असून त्याखालोखाल दिल्लीत ४६५, राजस्थान २३६ आणि केरळमध्ये २३४ रुग्ण मिळाले आहेत.  तर आतापर्यंत ९९५ जण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासात  देशभरात ९० हजार ९२८ नवीन रुग्ण आढळले आहेत. परवा आढळलेल्या नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा कालची रुग्णसंख्या जवळजवळ दुप्पट आहे. सध्या देशभरात २ लाख ८५ हजार ४०१ कोविड रुग्ण उपचार घेत असून रुग्ण बरे होण्याचा दर  ९७ पूर्णांक ८१ शतांश टक्के आहे. गेल्या २४ तासांत १९ हजाराहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत तर ३२५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
अमेरिकेत मंकीपॉक्स सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी म्हणून जाहीर
Image
भंडारा महिला अत्याचार प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करावी – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
Image
नैसर्गिक शेतीमुळे कृषी क्षेत्रात कायापालट घडून येईल, असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विश्वास
Image
सरकारी तपास यंत्रणांनी बजावलेल्या समन्सला संसद सदस्य टाळू शकत नाहीत- सभापती एम. व्यंकय्या नायडू
Image