केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भाजपच्या राज्य प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल भाजपच्या राज्य प्रतिनिधींशी अर्थसंकल्पपूर्व चर्चा केली. या चर्चेत २५ राज्यांच्या प्रतिनिधींनी भाग घेतला असं भाजपा चे राष्ट्रीय प्रवक्ते गोपाल कृष्ण अग्रवाल यांनी सांगितलं. या चर्चेत उद्योजक, व्यावसायिक, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, अदिवासी समुदाय, मागासवर्गीय तसंच विविध क्षेत्रातल्या महिलांनी निवेदनं केली.