श्रीलंकेमधे आर्थिक आणिबाणी जाहीर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेमधे आर्थिक संकट गंभीर बनलं असून राष्ट्राध्यक्ष गतभय राजपक्षे यांनी आर्थिक आणिबाणी जाहीर केली आहे. कोविड महामारीमुळे पर्यटनव्यवसायातली मंदी, वाढता सरकारी खर्च, करकपात, आणि चिनी कर्जाच्या परतफेडीमधे जाणारा पैसा यामुळे सरकारी तिजोरीत खडखडाट झाला आहे. परकीय चलन साठ्याने दशकभरातला नीचांक गाठला आहे. परदेशी आणि देशांतर्गत कर्जरोख्यांची देणी चुकती करण्याकरता सरकारने भरमसाठ चलन छापल्यावर महागाईने उच्चांक पार केला असून अनेकांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तू परवडेनाशा झाल्या आहेत. 

 

 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image