शाळा सुरू करताना आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे निर्देश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत, यासाठी आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करायचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. कोरोनामुळे राज्यात बंद असलेल्या शाळा येत्या सोमवारपासून पुन्हा सुरू होणार आहेत, त्यापार्श्वभूमीवर केल्या जात असलेल्या तयारीचा आज वर्षा गायकवाड यांनी आढावा घेतला.  त्यावेळी त्या बोलत होत्या. ज्या ठिकाणी कोरोनाबाधितांचा दर अधिक असेल तिथे जिल्हा प्रशासनासोबत चर्चा करून निर्णय घ्यावा, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी केली. शालेय शिक्षण आयुक्त, सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, महानगरपालिकांमधील संबंधित अधिकारी या आढावा बैठकीला उपस्थित होते.