फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिला संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फुटबॉलमध्ये आशिया चषकात भारतीय महिलांचा संघ कोरोनाबाधित झाल्यानं स्पर्धेबाहेर गेला आहे. आशियायी फुटबॉल महासंघाच्या नियमानुसार एखादा संघ सामन्यासाठी मैदानावर येऊ शकला नाही तर त्याला स्पर्धेबाहेर काढले जाते. त्यामुळं काल भारत आणि चायनीज तैपेईतला सामना रद्द झाला. मुंबई आणि पुण्यात हे सामने सुरू आहेत.