दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोविड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका ट्विटमध्ये केजरीवाल यांनी माहिती देताना सांगितलं की त्यांना कोविड-१९ ची सौम्य लक्षणे आहेत आणि त्यामुळे त्यांनी स्वत:ला घरात विलगीकरणात ठेवलं आहे. गेल्या काही दिवसांत त्याच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःचं विलगीकरण करून चाचणी करावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.