कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कझाकिस्तानामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात सव्वा दोनशे लोकांचा मृत्यू झाला असल्याचं कझाकिस्ताननं अधिकृतरित्या जाहीर केलं आहे. कझाकिस्तानच्या कायदेशीर कारवाई विभागाचे प्रमुख सेरिक शलाबायेव यांनी काल ही माहिती दिली. मारले गेलेल्यांमध्ये काही नागरिक तसंच सुरक्षा दलांकडून मारले गेलेल्या सशस्त्र अतिरेक्यांचाही समावेश आहे. या महिन्यात इंधन तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्यानं ही हिंसक निदर्शनं सुरु झाली. ५० हजाराच्या जमावाने देशभर दंगली केल्या. अनेक मोठ्या शहरांमध्ये सरकारी इमारती, वाहनं, बँका आणि दुकानं पेटवून दिली, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, कझाकिस्तानचे अध्यक्ष कासिम-जोमार्त तोकायोव यांनी नूर सुलतान नगरबायेव्ह यांना हटवून राष्ट्रीय सुरक्षा समिती स्वत:च्या ताब्यात घेतली.  

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image