कोविड 19 चा मृत्युदर कमी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा मृत्युदर शक्य तेवढा कमी करण्यासाठी सर्व संबंधितांनी कसोशीने प्रयत्न करण्याचं आवाहन केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी केलं आहे. देशातली सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना यासंदर्भात लिहीलेल्या पत्रात भूषण यांनी म्हटलं आहे की महामारीचा फैलाव रोखणं, चाचण्या वाढवणं, कोविड अनुकूल वर्तनाला प्रोत्साहन देणं, कोविड विषयी जनजाग़ती करणारी चर्चा विविध मंचांवर घडवून आणणं महत्त्वाचं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयाच्या पुढाकाराने यासंदर्भात येत्या 5 ते 19 जानेवारी दरम्यान कोविड विषयक वेबिनारची मालिका आयोजि करण्यात आली आहे.