काटोल ते नागपूर हे अंतर 15 ते 20 मिनिटात कापता येईल - नितीन गडकरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे, राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा कार्यारंभ आज केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला. ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्या असून त्याचं काम आता वर्षभरात पूर्ण होईल, असा विश्वास यावेली गडकरी यांनी व्यक्त केला. काटोल ते नागपूर हे अंतर केवळ 15 ते 20 मिनिटात कापता येईल आणि काटोल ही नागपूरची सॅटॅलाइट सिटी म्हणून ओळखली जाईल, असं ते म्हणाले. नागपूर ते काटोल या रस्त्यामध्ये वनविभागाची परवानगी तसंच इतर अनेक अडचणी आल्या, त्या दूर करून आता या चौपदरीकरणाचं काम आता चालू झालं आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितल. या प्रकल्पाच्या कामासाठी एकंदर 1 हजार 184 कोटी रुपये निधीची तरतूद केली असून, रस्त्याच्या या भागाची लांबी 48 किलोमीटरपेक्षा जास्त आहे.