दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगला रौप्यपदक  

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तुर्कस्तानात इस्तंबूल इथं झालेल्या दिव्यांगांसाठीच्या नवव्या जागतिक तायक्वोंदो अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या चंदीप सिंगनं रौप्यपदकाची कमाई करत काल इतिहास रचला. पुरूषांच्या ८० किलोग्रॅमहून अधिक वजनी गटात त्यानं भारताला या स्पर्धेतलं पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं. जम्मू-कश्मीर क्रीडा परिषदेत त्यानं प्रशिक्षण घेतलं आहे. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.