देशाचा कोरोनामुक्ती दर ९८ पूर्णांक ३७ शतांश टक्के

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात सोमवारी कोविड-१९ चे ७ हजार ९९५ रुग्ण बरे झाले. तर, ५ हजार ७८४ नव्या रुग्णांची नोंद झाली. देशभरात सध्या ८८ हजार ९९३ अॅक्टाव्ही रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. सध्या देशाचा कोरोनामुक्ती दर ९८ पूर्णांक ३७  शतांश टक्के आहे.