ओमायक्रॉनवर सध्या उपलब्ध लस कमी प्रभावी ठरत असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा प्राथमिक अंदाज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन या कोविडच्या नव्या उत्परावर्तित विषाणूला प्रतिबंध करण्यात सध्या उपलब्ध लस कमीप्रभावी ठरत असल्याचा प्राथमिक अंदाज पुराव्यांवर दिसून येत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. संघटनेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, लसीचा प्रभाव किंवापुर्वीच्या संसर्गापासून मिळालेल्या प्रतिकार शक्तीला नवा ओमिक्रॉन विषाणू किती मातदेऊ शकतो हे समजून घेण्यासाठी अधिक आकडेवारीची गरज आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्याआरोग्य विभागानेही ओमायक्रॉन विषाणूचा धोका अधिक असल्याचे म्हटले आहे. यापुर्वी एप्रिलमध्ये डेल्टा हा विषाणू चिंतेचा विषय ठरला होता. ग्लोबल सायन्स डेटाबेसवर नोंदणीकृत डेल्टा अनुक्रमांची टक्केवारी या आठवड्यात चिंतेच्या इतर प्रकारांच्या तुलनेत घसरली आहे.