२०२२ वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना जाहीर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : २०२२ या वर्षासाठीचा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी लेखक दामोदर मावजो यांना जाहीर झाला आहे. तर २०२१ चा ज्ञानपीठ पुरस्कार आसामी लेखक नीलमणी फूकन यांना दिला जाणार आहे. हा पुरस्कार मिळवणारे मावजो दुसरे कोकणी लेखक आहेत. दामोदर मावजो हे गोव्याचे कादंबरीकार, स्तंभलेखक, पटकथा लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांना १९८३ मध्ये 'कार्मेलिन' या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कारानं करण्यात आलं होतं.