कोरोनाच्या सर्व प्रकारांचा अहवाल एकाच चाचणीद्वारे देणाऱ्या किटचं पुण्यातल्या जीनपॅथ डायग्नॉस्टिक सेंटरकडून संशोधन

 

पुणे : पुण्यातील जीनपॅथ डायग्नॉस्टिक सेंटरनं एकाच चाचणीद्वारे कोरोनाच्या सर्व प्रकारांचा शोध घेण्याचा संच तयार केला आहे. कोविडेल्टा नावाच्या या संचाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं मान्यता दिली आहे. डेल्टा आणि ओमीक्रोन प्रकारांसह जगभरात वर्णन केलेल्या सर्व कोविड प्रकारांचा शोध घेण्यास हा संच सक्षम असल्याचं जीनपॅथ डायग्नॉस्टिक सेंटरचे प्रमुख डॉक्टर निखील फडके यांनी सांगितलं.