१९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील वर्षी होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १७ खेळाडूंच्या भारतीय संघाची घोषणा काल करण्यात आली. १९ वर्षांखालील १४ वी विश्वचषक क्रिकेट स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत. भारताच्या ब गटात दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडाचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीचा फलंदाज यश धूल संघाचा कर्णधार, तर एस के रशीद याला उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं असून दिनेश बाना विक्रेट किपर तसंच निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, राज अंगतबावा, मानव प्रकाश, कौशल तांबे, वसू वत्स, विकी ओत्सवाल, रविकुमार आणि गौरव संगवान इत्यादींचा या संघात सहभाग असणार आहे. या स्पर्धेत १६ संघ ४८ सामने खेळणार आहेत.