वाराणसी इथं काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं श्री काशी विश्वनाथ धामच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन केलं. यावेळी ३ हजाराहून अधिक मान्यवर आणि साधु उपस्थित होते. ३३९ कोटी रूपये खर्च करून हे धाम बांधलं असून हा प्रकल्प पाच लाख चौरस फूट परिसरात पसरलेला आहे. प्रधानमंत्र्यांच्या देखरेखीखाली हा प्रकल्प विकसित झाला असून मार्च २०१९ मधे त्याचा कोनशिला समारंभ त्यांच्याच हस्ते झाला. या प्रकल्पामुळे गंगा घाट आणि काशी विश्वनाथ मंदिर एकमेकांना थेट जोडले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २३ इमारतींचं उद्घाटन झालं असून त्यामुळे भाविकांना अनेक सेवासुविधा उपलब्ध झाल्या आहेत. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा पुरवल्या जाणार आहेत. प्रधानमंत्र्यांनी सुरूवातीला कालभैरव मंदिरात जाऊन दर्शन  घेतलं. पूर्वी ३ हजार वर्ग फूट क्षेत्रफळावर असलेला परिसर आता ५ लाख वर्ग फुटापेक्षा अधिक झाला आहे. या कॉरिडॉरमुळं काशीमध्ये जाणं सोप होणार आहे असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image