५ ते ११ या वयोगटातल्या बालकांना फायझर- बायो एन टेकची लस देण्यास फ्रान्समध्ये मंजुरी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ५ ते ११ या वयोगटातल्या सर्वच बालकांना फायझर- बायो एन टेक या कंपन्यांनी विकसित केलेली लस देण्यास फ्रान्समध्ये काल मंजुरी देण्यात आली. ही लस लहान मुलांमध्ये प्रभावी ठरत असल्याचे चाचणीचे अहवाल असल्यानं त्याला परवानगी देण्यात आली असून बाजारात ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध होताच ती मुलांना दिली जाईल, असं सरकारतर्फे सांगण्यात आलं.