बैलगाडा शर्यंतीवर बंदी मागे घेण्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्वागत

  कोविडच्या धोकादायक नव्या विषाणूला रोखण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व करा; केंद्राच्या सूचनांची वाट न पाहता तातडीने कामाला लागा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

मुंबई : बैलगाडा शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजेच बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, बैलगाडा शर्यत ही पशूपालक आणि पशूधनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचे स्थान आहे. यातून पशूधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यंतीमधून या सगळ्या बाबींना प्रोत्साहन मिळत असे. शर्यंती सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ असा आणि चिवटपणे लढा द्यावा लागला. त्यामागेही बळीराजाचे आपल्या पशूधनावरील प्रेमाचे बळच होते. शर्यती, असोत किंवा नसोत, आपले पशूपालक या पशूधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतात, हे सर्वांनाच माहित होते. आता शर्यती सुरु होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशूधनाचे वैभवही सगळ्यांना पाहता येईल. शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये. त्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यानी केले आहे.

Popular posts
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताची ऑस्ट्रेलियावर ८२ धावांची आघाडी
Image
मुंबईत लॉकडाऊनच्या दुसरा दिवशी व्यापारी आणि व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण
Image
आजादी का अमृत महोत्सव म्हणजे आत्मनिर्भरतेचं अमृत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन
Image
देशातल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात दिलेल्या योगदानाचा पंतप्रधानांद्वारे गौरव
Image
येत्या तीन वर्षात सुमारे ३६ हजार ५०० किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधणार असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचं लोकसभेत प्रतिपादन
Image