केंद्रीय मंत्रीमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीवरुन झालेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मंत्रीमंडळातून अजय कुमार मिश्रा यांना हटवावं या मागणीसाठी विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. आज सभागृहाचं कामकाज सुरु होताच, द्रमुकचे टी.आर बालू यांनी लखीमपूर खेरी प्रकरणी विशेष तपास पथकाच्या अहवालाचा मुद्दा उपस्थित केला. या अहवालाचा संदर्भ देत, अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा यात गुंतलेला असल्याचा आरोप त्यांनी केला. मिश्रा यांना मंत्री मंडळातून हटवण्याची मागणी करत काँग्रेस आणि द्रमुकचे सदस्य हौद्यात उतरुन घोषणाबाजी करु लागले. हा मुद्दा प्रश्नोत्तरांच्या तासांनंतर उपस्थित करावा आणि सभागृहाचं काम चालू द्यावं, असं आवाहन सभापती ओम बिर्ला यांनी या सदस्यांना केलं. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. कोविड धोका अद्याप संपलेला नसल्यानं या सदस्यांनी मुखपट्टी लावावी, असं आवाहन संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केलं. गोंधळ वाढत गेल्यानं कामकाज आधी दुपारी दोन वाजेपर्यंत, तर नंतर दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image