प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीत सुधारणा झाली - निसिथ प्रमाणिक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अंतर्गत सुरक्षाविषयक परिस्थितीत सुधारणा झाली असं केंद्रीय गृह राज्यमंत्री निसिथ प्रमाणिक यांनी म्हटलं आहे. निसिथ प्रामाणिक यांनी आज नवी दिल्लीत, सशस्त्र सीमा बलाच्या ५८व्या स्थापना दिनानिमीत्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केलं. देशविरोधात कारवाया करणाऱ्या कोणत्याही शक्तींचे मनसुबे सशस्त्र सीमा बल हाणून पाडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू-काश्मीरमधली बंडखोरी, तसंच इतर राज्यांमधल्या नक्षलवादी कारवायांचा सशस्त्र सीमा बल यशस्वीपणे सामना करत आहे अशा शब्दांत त्यांनी सशस्त्र सीमा बलाच्या कार्याचं कौतुकही केलं.