प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज हिमाचल प्रदेशात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात ११ हजार कोटी रूपयांच्या जलविद्युत प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मंडी इथं उपस्थित आहेत. या प्रकल्पांविषयी पुस्तिकेचं प्रकाशन त्यांच्या हस्ते थोड्याच वेळापूर्वी झालं. त्यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यावेळी उपस्थित होते. प्रधानमंत्र्यांनी आज हिमाचल प्रदेश सरकारच्या विविध विभागानी आयोजित केलेल्या प्रदर्शनाला भेट दिली. मंडी जिल्ह्यात २८ हजार १९७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पाचं भूमीपूजनही प्रधानमंत्र्यांनी केलं.