राज्यात थंडीच्या कडाक्यात वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. अनेक ठिकाणी दिवसा उन्हाची तीव्रताही वाढल्याचा अनुभव येत आहे. या हंगामातल्या निचांकी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात निफाड इथं काल साडेसहा अंश सेल्सिअस इतकी झाली.सांगली शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपासून हवामानाच्या लहरीपणाचा अनुभव येत आहे. शहरासह जिल्ह्यातील काही भागात आज पहाटेपासून सकाळी १० वाजेपर्यंत धुक्याची चादर पसरली होती. दाट धुक्यांमुळे दृष्यमानता कमी होऊन सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांसह, शाळकरी मुले आणि चाकरमान्यांना धुक्यातून वाट काढावी लागत होती. वाहनचालकांना जात असतान तारेवरची कसरत करावी लागत होती. आज सकाळी सरासरी कमाल तापमान १२ अंशापर्यंत खाली आले होता.