प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्यात भारत-रशिया शिखर बैठकीत चर्चेसह २८ करारांवर स्वाक्षऱ्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे  राष्ट्रेपति व्लाथदिमीर पुतिन यांच्यात काल नवी दिल्लीत झालेल्या २१ व्या भारत-शिखर बैठकीत स्थानिक आणि जागतिक मुद्द्यांसहित कोविड संकटानंतरची जागतिक आर्थिक सुधारणा तसंच अफगाणिस्तान देशातली स्थिती आदी मुद्द्यांवर चर्चा झाली.  गेल्या काही वर्षात जागतिक पातळीवर अनेक मूलभूत बदल झाले, मात्र भारत आणि रशियामधल्या संबंधामध्ये कोरोनाच्या संकटकाळातही फरक पडला नाही, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत दोन्ही देशांमध्ये चांगलं सहकार्य राहिलं, 2021 हे वर्ष भारत- रशिया संबंधाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरलं, असंही ते म्हणाले. रशिया हा भारताला एक महान शक्ती आणि दीर्घकाळ कसोटीवर उतरलेला मित्रदेश मानतो, असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सांगितलं. या दौऱ्यादरम्यान मोदी आणि पुतीन यांच्यात अनेक महत्वाच्या मुद्द्यांच्या चर्चेसह  एकूण 28 करारांवरही सह्या करण्यात आल्या. दोन देशांमधला व्यापार वाढत असल्याबद्दलही यावेळी समाधान व्यक्त करण्यात आलं. 2025 पर्यंत दोन्ही देशांदरम्यानचा व्यापार 30 अब्ज डॉलरपर्यंत आणि गुंतवणूक 50 अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.