भारताची हरनाझ संधू ठरली यंदाची मिस युनिव्हर्स

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताची हरनाझ संधू यंदाची मिस युनिव्हर्स ठरली आहे. १९९४ मधे सुश्मिता सेननं, तर २००० मधे लारा दत्तनं हा किताब पटकावला होता. त्यामुळे तब्बल २० वर्षांनंतर भारताकडे हा किताब आला आहे. इस्रायलच्या आयलत शहरात आज सकाळी २१ वर्षीय हरनाझला गतवर्षीची विजेती मेक्सिकोची अॅड्रिया मेझा हिनं मिस युनिव्हर्सचा मुकुट घातला. तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. चंदिगढच्या हरनाझनं पॅराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा किताब पटकावला.