तीन कृषी कायदे रद्द करण्याची अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करण्याची राजपत्र अधिसूचना आज जारी केली. संसदेच्या सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहांमध्ये हे कायदे रद्द करण्याबाबतचं विद्ययक मंजूर केलं होतं. 

गेल्या महिन्यात १९ तारखेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हे कायदे हिवाळी अधिवेशनात रद्द करण्याची घोषणा केली होती. तसंच आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना आंदोलन थांबून घरी जाण्याचं आवाहन केलं होतं. शेतीशी संबंधित सर्व बाबीचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली होती.