नाशिक जिल्ह्यातल्या प्रमुख बाजारपेठेत कांद्याच्या भावात मोठी घसरण

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यातली प्रमुख बाजारपेठ असलेल्या मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत आज उन्हाळ आणि लाल कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली. उन्हाळ कांद्याच्या भावात क्विंटल मागे सरासरी ६५० रूपये तर लाल कांद्याच्या भावात ५५० रूपयांची घसरण झाली. उन्हाळ कांद्याचा प्रति क्विंटल भाव  आज सरासरी २ हजार ५० रूपये, लाल कांद्याचा भाव  सरासरी १ हजार ७५० रूपये तर सफेद कांद्याचा भाव  सरासरी १ हजार ७९१ रूपये प्रति  क्विंटल इतका होता. यंदा अवकाळी पावसानं कांद्याच्या पिकाचं नुकसान झालं. तसंच  कांद्याच्या भावात  क्विंटल मागे ५०० ते ६०० रूपयांची घसरण झाल्यानं  शेतकर्यांयनी नाराजी व्यक्त केली.