राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार- देवेंद्र फडनवीस

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकार गरीब दीन दलितांचं सरकार नसून दारू विकणाऱ्याच सरकार आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी केला आहे. ते आज भंडारा गोंदिया जिल्ह्यात मोहाडी इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुक प्रचारादरम्यान बोलत होते. भाजप सरकार असताना धानाचा बोनस वेळेवर मिळत होता मात्र या सरकारनं बोनस बंद केल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातल्या बार मालकांच्या मागणीवरून बार चालवण्याचे दर अर्ध्यावर आणून आता विदेशी दारूवरचा करही  ५० टक्के कमी केल्याचा आरोप फडनवीस यांनी केला.