ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लागू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनं काल रात्रीपासून पुढील महिन्याच्या 7 तारखेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. संचार बंदीच्या काळात रात्री 10 ते पहाटे 5 दरम्यान सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतील. तसंच 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत सर्व उपहारगृह, बार आणि पबमध्ये 50 टक्के उपस्थितीबाबतचे निर्बंध राज्य सरकारनं घातले आहेत. केरळमध्येही येत्या 30 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय केरळ सरकारनं घेतला आहे. 31 डिसेंबरला रात्री 10 नंतर नवीन वर्षानिमित कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम होणार नाहीत असे निर्देश राज्य सरकारनं दिले आहेत. उत्तराखंड मध्येही रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून, अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आलं आहे.