ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओमायक्रॉन’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापरिनिर्वाण दिनाला दीक्षाभूमीवर गर्दी टाळण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आहे. तसंच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजीचा महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर पूर्ण खबरदारी घेवून साध्या पध्दतीनं आणि एकत्रित न येता, आयोजित करण्याच्या सूचना नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. यांनी एका परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनी कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ आणि  पुस्तकांचे स्टॉल लावू नयेत  तसंच कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणं, निदर्शनं, आंदोलनं आणि  मोर्चे काढू नयेत त्यासह स्थानिक प्रशासनानं विहित केलेल्या नियमांचं काटेकोर पालन नागरिकांनी करावं, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
‘यपटीव्ही’ने आयपीएल २०२१च्या ब्रॉडकास्टिंगचे अधिकार मिळवले
Image
भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला
Image
वैद्यकीय ऑक्सिजन उत्पादन वाढवण्यासाठी 'एमजी मोटर इंडिया'चा पुढाकार
Image
'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमेअंतर्गत रीव्हर 'सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे रविवारी आयोजन
Image