जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना मंजुरी
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातील दरडोई निकषापेक्षा जास्त असलेल्या 60 ग्रामीण पाणीपुरवठा योजनांना, राज्यातील 858 कोटीच्या कामांना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडलेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, जलजीवन मिशनचे संचालक ऋषीकेश यशोद यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जलजीवन मिशन योजनेंतर्गत राज्यातीलमजीप्राअंतर्गत मान्यता मिळालेल्या योजना
अहमदनगर जिल्हा : बेलवंडी बु. पा. पु. योजना, ता. अहमदनगर, वाढीव मिरजगाव पा. पु. योजना ता. कर्जत, अहमदनगर, वारी कान्हेगाव पा. पु योजना ता. कर्जत, जि.अहमदनगर, माळेगाव थडी पा. पु. योजना ता. कोपरगाव अहमदनगर, निमगाव भोजापूर व ३ गावे पा. पु योजना ता.संगमनेर जि. अहमदनगर, जवळेकडलग व १ गावे पा. पु. योजना ता. संगमनेर जि.अहमदनगर, गुंजाळवाडी व १ गावे पा. पु. योजना, ता.संगमनेर जि. अहमदनगर,
नाशिक जिल्हा : चिंचवड व ६ गावे पा. पु. योजना ता. त्र्यंबक, जि. नाशिक
जळगाव जिल्हा : धानोरा, ता. चोपडा जि. जळगाव, उचंदे व ७ गावे, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव
अमरावती जिल्हा : 19 गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता.चांदूरबाजार जि. अमरावती, नांदगाव पेठ व ३२ गावे प्रा. पा.पु. यो., ता. जि. अमरावती, तेल्हारा व ६९ गावे प्रादेशिक पा.पु. यो. जि. अमरावती, १०५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना,अमरावती
बुलडाणा जिल्हा : चिंचोली व ३० गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ता. खमगांव व ता. शेगांव, बुलढाणा, मौ. पाडळो व ५ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना, बुलडाणा
नागपूर जिल्हा : घोट, ता. चामोर्शी, जि. गडचिरोली नळ पा.पु. योजना, नागपूर
रत्नागिरी जिल्हा : मौ. धोपवे, ता.गुहागर, जि.रत्नागिरी, मौ.पालगड, ता.दापोली, जि.रत्नागिरी
रायगड जिल्हा : मौ.कडाव, ता.कर्जत, जि.रायगड, मौ.देवन्हावे, ता.खालापूर, जि.रायगड
ठाणे जिल्हा : मौ.रायता व 14 गावे प्रा.पा.पु ता.कल्याण, जि. ठाणे
महाराष्ट्र जलजीवन मिशनअंतर्गत जिल्हा परिषद पाणी पुरवठा योजनेस मान्यता मिळालेल्या योजना
कोल्हापूर जिल्हा : बहिरेवाडी, ता. आजरा जि. कोल्हापूर, मो. हरपवडे ता. आजरा जि. कोल्हापूर, मौ. न्हाव्याचीवाडी, ता. भुदरगङ जि. कोल्हापूर,
परभणी जिल्हा : मौ. जलालपूर, ता. परभणी, जि. परभणी, मौ. बानेगाव व मौ. माहेर ता. पूर्णा, जि. परभणी
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.