शिर्डीचे साईबाबा मंदीर 31 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात भाविकांना दर्शनासाठी राहाणार बंद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासनाने दिलेल्या जमावबंदीच्या नव्या सुचनांनुसार शिर्डीचे साईबाबा मंदीर 31 डिसेंबर पासून रात्री 9 ते सकाळी 6 या वेळात भाविकांना दर्शनासाठी बंद राहाणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली आहे. राज्यात ओमीक्रॉनचा वाढता संसर्ग आणि नाताळच्या सुट्ट्याच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारने 25 डिसेंबरपासूनच रात्री जमावबंदीचे आदेश काढले आहेत. त्या अनुषंगाने संस्थानने हा निर्णय घेतला आहे.