19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दुबईत सुरू असलेल्या 19 वर्षांखालील आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या संघाने साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या विजयामुळे भारत या गटात पाकिस्ताननंतर दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता भारताचा सामना बांगलादेश आणि श्रीलंकेदरम्यानच्या सामन्यात विजय मिळवणाऱ्या संघाविरोधात होईल.