मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या नोव्हेंबर महिन्यातील ‘पुनरीक्षण कार्यक्रम; नोंदणी करा, मतदार व्हा’ या अंकाचे नुकतेच प्रकाशन झाले.
लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुकांमध्ये मतदार म्हणून आपला हक्क बजावणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी 2022 रोजी ज्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण होत आहेत त्यांच्या नावाची नोंदणी 1 ते 30 नोव्हेंबर 2021 दरम्यान निवडणूक मतदार यादीमध्ये केली जात आहे. त्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यभर विशेष संक्षिप्त ‘पुनरीक्षण कार्यक्रम’ राबवला जात आहे. या कार्यक्रमाविषयी व मतदार नोंदणीविषयी महत्त्वपूर्ण माहिती या अंकात देण्यात आली आहे. त्याचबरोबर शाळा पुन्हा सुरू, लसीकरण, ई-पीक पाहणी, कृषी यशकथा, सौरऊर्जेतून महावीजनिर्मिती, रक्तदान, मराठी रंगभूमी दिन, स्पर्धा परीक्षा आदींविषयीचे लेख या अंकात समाविष्ट करण्यात आले आहेत. शिवाय मंत्रिमंडळात ठरले, महत्त्वाच्या घडामोडी या नेहमीच्या सदरांचाही अंकात समावेश आहे. हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in/ या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.