भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज पार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी बैठक आज झाली. या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव संमत झाला. भाजपा नेते प्रकाश जावडेकर यांनी बैठकीनंतर बातमीदारांशी बोलतांना ही माहिती दिली. देशातल्या नागरिकांचा प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. आपल्या नेतृत्वाच्या २० वर्षाहून अधिक काळाच्या सेवेत त्यांनी, व्यवस्थेत पारदर्शकता आणली असं ते म्हणाले. यावेळी जावडेकर यांनी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वात, शेतकरी, गरीब व्यक्ती, तसंच समाजातले इतर घटक आणि विविध क्षेत्रात झालेल्या कामांची माहिती दिली.