अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला जाणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मनुष्यबळ आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारितल्या रोजगार महासंचालनालयातर्फे अनुसुचीत जाती आणि जमातीच्या १८ ते २७ वयोगटातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी विद्यावेतन अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. नागपूर इथल्या प्रतिष्ठित संस्थेच्या माध्यमातून हे अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. यात इंग्रीत, मराठी टंकलेखन, लघुलेखन, संगणक प्रशिक्षण यांचा समावेश करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम ११ महिन्यांचा असेल. या अभ्यासक्रमासाठी १२ वी उत्तीर्ण असणं बंधनकारक आहे. सरकारी नियमाप्रमाणे उमेदवारांना प्रती महिना एक हजार रुपये विद्यावेतन मिळेल. इच्छुकांनी रोजगार मंत्रालय, नवी प्रशासकीय इमारत क्रमांक एक, पाचवा माळा, सिवील लाईन्स, नागपूर -४४०००१ या पत्त्यावर अर्ज करावा, असं आवाहन मंत्रलयानं केलं आहे.