'तीर्थ यात्रा' स्थळांचा ६७३ किलोमीटरचा प्रदेश १२ हजार ७० कोटी रुपये गुंतवून विकसित

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वैष्णोदेवी, सुवर्ण मंदिर, ऋषिकेश, हरिद्वार, चार धाम यासह सर्व 'तीर्थ यात्रा' स्थळांचा जवळपास ६७३ किलोमीटरचा प्रदेश १२ हजार ७० कोटी रुपये गुंतवून विकसित करण्यात आला असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल सांगितलं. ते प्रधानमंत्र्यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (NH-965) आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग (NH-965H) या प्रमुख भागांच्या चौपदरीकरणाची पायाभरणी केल्यानंतर बोलत होते. 'भारतमाला परियोजनेअंतर्गत', वरील स्थळे विकसित करण्यात आली आहेत. सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर उर्वरित ८२७ किलोमीटर रस्त्याचे काम केले जाईल, असंही गडकरी म्हणाले.