राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात पटकावलं सुर्वण पदक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत आज भावेश शेखावत यांनी २५ मिटर रॅपिड फायर पिस्तोल प्रकारात सुर्वण पदक पटकावलं. डॉ. करनी सिंग शुटींग रेंजवर झालेल्या या स्पर्धेत त्यानं ३३ हिट्स केल्या. हे त्याचं पहिलं राष्ट्रीय पदक आहे. सेनादलाच्या गुरुप्रित सिंगने रौप्य तर, अनिश भानवाल यानं कांस्य पदक पटकावलं. ही राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पाटियाला, दिल्ली आणि भोपाल इथं खेळवली जात आहे.