देशात आतापर्यंत १३१ कोटी ५ लाखापेक्षा जास्त लस मात्र पुरवण्यात आल्या

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या मोफत लसीकरण योजने अंतर्गत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत १३१ कोटी ५ लाखापेक्षा जास्त लस मात्र पुरवण्यात आल्या असून यापैकी २१ कोटी ६४ लाखापेक्षा जास्त लस मात्रा अजूनही शिल्लक असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशव्यापी लसीकरण मोहिमे अंतर्गत देशात निर्माण होणाऱ्या एकूण लसींपैकी ७५ टक्के लस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना मोफत पुरवली जात असल्याचं यात म्हटलं आहे.