यवतमाळ येथील घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडून गंभीर दखल; जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना सखोल चौकशीचे आदेश

  महाराष्ट्रातील रंगकर्मीसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई : यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात काल (बुधवारी) रात्री घडलेल्या घटनेची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून यवतमाळचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या अशोक पाल या विद्यार्थ्यावर रात्री आठ ते नऊच्या सुमारास अज्ञात इसमांनी केलेल्या हल्ल्यात हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला होता.  रुग्णालयात उपचार घेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

ही घटना अतिशय गंभीर असून याबाबत यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांचा अहवाल तातडीने मागविण्यात आला असून या दुर्दैवी घटनेत झालेल्या विद्यार्थ्यांच्या मृत्यूबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे. या घटनेच्या मुळाशी जाऊन खोलवर चौकशी केली जाईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री.देशमुख यांनी दिली.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image