परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या कथित गुप्त बैठकीच्या चौकशीचे आदेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यात काल झालेल्या कथित गुप्त बैठकीची चौकशी करण्याचे आदेश मुंबई पोलिसांना दिले असल्याचं, गृहमंत्री दीलिप वळसे पाटील यांनी सांगितलं. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला न्यायालयाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली, याची चौकशी केली जाईल, असं ते म्हणाले. परमबीर सिंग यांच्या निलंबनाची कारवाई सुरु असल्याचं गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.