महाराष्ट्रात आज १ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आज १ हजार ८९८ रुग्ण बरे होऊन घरी गेले, २ हजार १४९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर २९ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ८८ हजार ४२९ जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख १५ हजार ३१६ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३९ हजार ७३४ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २९ हजार ७८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ३७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.