राज्यात उद्यापासून १४ ऑक्टोंबरपर्यंत 'मिशन कवचकुंडल' राबवण्यात येणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात येत्या ६ दिवसात ९० लाख जणांचं लसीकरण करण्याच्या उद्देशानं मिशन कवच कुंडल या विशेष लसीकरण मोहीमेची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज केली. उद्यापासून १४ ऑक्टोंबर दरम्यान चालणाऱ्या या सत्रात दररोज १५ लाख जणांना लसीच्या मात्रा देण्यात येणार आहेत. लसीची पहिली मात्रा घेणाऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं. या विशेष मोहीमेसाठी लस देण्यासाठी आवश्यक असलेल्या सिरिंजसह मनुष्यबळ उपलब्ध करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.