आयपीयल किक्रेट स्पर्धेत सोमवारी झालेल्या उपांत्य सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सचा विजय

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयपीयल किक्रेट स्पर्धेत शारजा इथं काल रात्री झालेल्या उपांत्य सामन्यात कोलकत्ता नाईट रायडर्सनं, रॉयल चॅलेजर्स बगळुरुचा चार गडी राखून पराभव केला. बगळुरुनं प्रथम फलंदाजी स्वीकारत निर्धारीत २० षटकात १३८ धावा केल्या होत्या. कर्णधार विराट कोहलीनं ३३ चेंडूत ३९ धावांच योगदान दिलं होतं. कोलकत्तानं विजयी लक्ष्य ६ गडी गमावत २ चेंडू बाकी असताना पार केलं. शुभंमन गिलनं २९, तर  व्येंकटेश अय्यर आणि सुनील नरेन या दोघांनी प्रत्येकी २६ धावा केल्या. सुनीलनं गोलदाजी करतानाही बगळुरुचे चार गडी बाद केले होते. त्यामुळे तोच सामनावीर ठरला. उद्या कोलकत्ता आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात शारजा इथंचं पात्रता सामना होईल. या सामन्यातला विजेता संघ येत्या शुक्रवारी दुबई इथं होणाऱ्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्सशी लढत देईत.