कोविड लसीकरण मोहिमेत देशानं १०५ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड लसीकरण मोहिमेत देशानं १०५ कोटी मात्रांचा टप्पा ओलांडला आहे. देशात कालपर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या १०४ कोटी ९६ लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या होत्या. काल ७४ लाख ३३ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लस दिल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. आज सकाळपासून २६ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे. महाराष्ट्रात काल चार हजार ४८५ लसीकरण सत्रांच्या माध्यमातून ४ लाख ६४ हजार ७४० नागरिकांचं लसीकरण झालं. आतापर्यंत ९ कोटी ७२ लाख १० हजार ५०० मात्रा लाभार्थ्यांना दिल्या असल्याचं आरोग्य विभागानं कळवलं आहे.