राज्यात सुमारे दीड वर्षानंतर आढळले एक हजारापेक्षा कमी रुग्ण
• महेश आनंदा लोंढे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची दैनदिन संख्या सातत्यानं घट होत असून काल ती हजाराच्या खाली आली. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे. काल राज्यभरात १ हजार ५८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८८९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६६ लाख ३ हजार ८५० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ३७ हजार २५ रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ४० हजार २८ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २३ हजार १८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.