‘अंधेरी-घाटकोपर लिंक रोड’च्या दर्जोन्नतीकरणाच्या प्रस्तावित कामांचा मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
• महेश आनंदा लोंढे
मुंबई : अंधेरी घाटकोपर मेट्रो मार्गाच्या खालील रस्त्याच्या सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड आणि सोयी सुविधांच्या प्रस्तावित कामांचा तसेच मुंबईतील अन्य पायाभूत सुविधांच्या कामांचा पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. सौंदर्यीकरणाबरोबरच नागरिकांसाठी सोयी सुविधांच्या कामांचा यामध्ये प्राधान्याने समावेश करण्याची सूचना त्यांनी केली.
एमएमआरडीए कार्यालयात झालेल्या बैठकीत एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास, महानगरपालिकेचे उपायुक्त संजीवकुमार, सहायक आयुक्त किरण दिघावकर तसेच सल्लागार कंपनी डब्ल्यूआरआय इंडिया चे प्रतिनिधी उपस्थित होते.
वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हरित मुंबई करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून मुंबईत सर्व विकासकामांमध्ये शक्य तेथे झाडे लावण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. अंधेरी घाटकोपर मार्गावरही पहिल्या टप्प्यात करण्यात येणाऱ्या विकास कामांमध्ये मुंबईच्या वातावरणास योग्य ठरतील अशी विविध प्रजातींची सुमारे ११०० झाडे लावली जाणार आहेत. त्याचबरोबर पादचाऱ्यांसाठी सोयी सुविधा, फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंग, सायकल ट्रॅक, पार्किंग, चार्जिंग पॉईंट, नागरिकांना बसण्यासाठी जागा, विविध ठिकाणी जंक्शनचा सौंदर्यीकरणाच्या माध्यमातून विकास आदी कामांनाही प्राधान्य देण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.