भास्करराव पाटील खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा, अविनाश घाटे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 

मुंबई (वृत्तसंस्था) : नांदेड जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते माजी राज्यमंत्री भास्करराव पाटील खतगावकर तसंच माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा आणि अविनाश घाटे यांनी आज नांदेड इथं काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत काँग्रेसमधे प्रवेश केला. नांदेड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर, जिल्हा परिषद सदस्य डॉ. मीनलताई पाटील खतगावकर, माजी नगरसेवक सरजितसिंघ गील यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांनीही यावेळी भाजपा सोडून कॉंग्रेसमधे प्रवेश केला. मला आता कोणतीही आपेक्षा नाही, फक्त वयानं वडील असलेल्यामुळे मी अशोक चव्हाण यांना आशिर्वाद आणि मार्गदर्शन करणार आहे, असं भास्करराव पाटील खतगावकर यावेळी म्हणाले.