लसीकरण पूर्ण झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांनाच मिळणार रेल्वेचा पास

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने आता केवळ लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच लोकलचा पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं सरकारी कर्मचारी, अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी, महापालिका कर्मचाऱ्यांना ओळखपत्रावर रेल्वेचा पास मिळणार नाही. केवळ लसीकरण पूर्ण झालेल्या आणि दुसरी मात्रा घेऊन १४ दिवस झालेल्या सर्वांना आपत्ती निवारण विभागाकडून मिळणाऱ्या युनिवर्सल पासच्याच आधारे रेल्वे प्रवास करता येईल. या सर्वांना मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही पास मिळू शकतील असं मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध झालेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.