केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं आयोजित ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ ही कार रॅली महाराष्ट्रात दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं आयोजित ‘सुदर्शन भारत परिक्रमा’ ही कार रॅली महाराष्ट्रात दाखल झाली असून या परिक्रमेत सहभागी होण्याचा मान ठाण्यातील नागरिक सुरेंद्र उपाध्याय यांना मिळाला आहे. सुमारे ५१ एनएसजी गार्ड या परिक्रमेत सहभागी झाले आहेत. एनएसजीची ही कार रॅली देशाच्या १२ राज्यांमधील  काकोरी स्मारक, भारत माता मंदिर, नेताजी भवन, स्वराज आश्रम, टिळक घाट, फ्रिडम पार्क, ऑगस्ट क्रांती मैदान, मणीभवन, साबरमती यांसारख्या ठिकाणांसह १८ प्रमुख शहरांतील शहिद स्मारकांना भेट देणार आहे,  नवी दिल्लीतील लाल किल्ला इथं या रॅलीचा समारोप होणार आहे.