करीरोड भागातील इमारतीच्या १९ व्या मजल्यावर लागलेल्या आगीत एकाचा मृत्यू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या करीरोड भागात लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अविघ्न पार्क या ६० मजली इमारतीच्या १९ व्या मजल्यावर ही आग लागली आहे. या ३० वर्षीय तरुणानं आगीतून बचावासाठी १९ व्या मजल्यावरुन उडी मारली होती. आत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या अग्निशमन दल आग विझविण्यासाठी प्रयत्नशील आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली.